आज केसरी येथील देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव
12:18 PM Dec 31, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
ओटवणे प्रतिनिधी
Advertisement
केसरी येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवारी ३१ डिसेंबर रोजी होत आहे. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणीची पाठीराखी अशी सातेरीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते.यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर सातेरी देवीला भरजरी वस्त्र व अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजवीण्यात येणार आहे. त्यानंतर देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे. रात्री सवाद्य पालखी मिरवणूकीनंतर उशिरा वालावलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे मानकरी तसेच केसरी ग्रामस्थानी केले आहे.
Advertisement
Advertisement