आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
04:05 PM Nov 11, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
गिरीजानाथाच्या दर्शनासाठी भाविकांची होणार अलोट गर्दी
Advertisement
ओटवणे प्रतिनिधी
सांगेली गावचे ग्रामदैवत श्री गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव आज मंगळवारी ११ नोव्हेंबर रोजी होत आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतरगिरीजानाथाला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजवीण्यात आले असून गिरीजानाथाच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे.यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणूकीनंतर उशिरा आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गिरीजानाथ देवस्थान कमिटी, देवस्थानचे मानकरी आणि सांगेली ग्रामस्थांनी केले आहे.
Advertisement
Advertisement