For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आज पारपोली श्री घाडवस देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव

12:23 PM Jan 18, 2026 IST | अनुजा कुडतरकर
आज पारपोली श्री घाडवस देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव
Advertisement

ओटवणे प्रतिनिधी

Advertisement

पारपोली येथील जागृत देवस्थान श्री घाडवस देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज रविवारी १८ जानेवारी रोजी होत आहे. नवसाला पावणारा आणि माहेरवाशिणीचा पाठीराखा अशी घाडवस देवाची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते.यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर श्री घाडवसला भरजरी वस्त्र व आकर्षक फुलांनी सजवीण्यात आले. आहे. त्यानंतर घाडवसच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होणार आहे. यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणूकीनंतर सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार कंपनीचे (नेरूर) नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन पारपोली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष गोविंद तेजम सचिव गोपाळ गावकर तसेच देवस्थानचे मानकरी, स्थानिक देवस्थान कमिटी आणि पारपोली ग्रामस्थांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.