आज असनियेच्या गडघेरा देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव
02:45 PM Jan 02, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
शिवकालीन हनुमंत गडावरील जागृत देवस्थान
Advertisement
ओटवणे
\ प्रतिनिधी
असनिये कणेवाडी येथील शिवकालीन श्री देव नितकारी महालक्ष्मी पिसादेवी गडघेरा पंचायतन देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज शुक्रवारी २ जानेवारीला होत आहे. शिवकालीन हनुमंत गडावरील जागृत देवस्थान म्हणून गडघेरा देवस्थान परिचित आहे. यानिमित्त सकाळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर या पंचायतन देवतांना सजविण्यात आले आहे. त्यानंतर दर्शनास प्रारंभ झाला.या निमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर सुधीर कलिंगड कलेश्वर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन गडकरी ग्रामस्थांनी केले आहे.
Advertisement
Advertisement