Satara : 'तरुण भारत संवाद'चा आज 30 वा वर्धापन दिन
सातारा जिल्ह्यातील नगराध्यक्षांचा गौरव सोहळा
सातारा : 'तरुण भारत संवाद' गेली ३० वर्ष राजधानी साताऱ्यातल्या प्रत्येक माणसाच्या मनातील ठाव घेणारे दैनिक आहे. प्रत्येक घटनेचा मागोवा घेऊन त्यामागील सत्य जाणून घेत त्याचे वास्तव समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न 'तरुण भारत'च्या माध्यमातून झालेला आहे. 'तरूण भारत'चे समूहप्रमुख, सल्लागार संपादक किरण ठाकूर, कार्यकारी संचालक प्रसाद ठाकूर आणि संचालक सौ. सई ठाकूर-बिजलानीयांच्या संकल्पनेतून यावर्षी सातारा तरुण भारत'च्या आवृत्तीच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सोमवारी, २९ रोजी सायंकाळी हॉटेल राधिका पॅलेसच्या लॉनवर स्नेहमेळावा रंगणार आहे.
दर्जेदार, बाचनीय, सत्य, परखड, निष्पक्ष असे लेखन असणारे दैनिकनवनिर्वाचित नगराध्यक्षांचा होणार गौरवसातारा जिल्हयातील नऊ नगर पालिका आणि एका नगर पंचायतीची नुकतीच निवडणूक होऊन नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची जनतेने निवड केली आहे. जनसेवक म्हणून ज्यांची निवड झाली आहे, अशा सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा गौरव सोहळा 'तरुण भारत संवाद'ने वर्धापन दिनानिमित्त आयोजित केला आहे.
म्हणून 'तरुण भारत'ची ओळख आहे. गेली ३० वर्ष ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात आपला एक वेगळा ठसा उमटवत विचारांचा बारसा आणि बसा जोपासण्याचे काम 'तरुण भारत'च्या माध्यमातून केले आहे.
दररोज घडणाऱ्या घटना मांडण्याबरोबर त्या घटनांची मिमांसा, विश्लेषण, त्या पाठीमागे जाऊन पाठपुरावा करण्याचे काम दैनिक 'तरुण भारत ने नेहमीच केले आहे. सातारा शहराबरोबरच जिल्ह्यातील लहानशा गावांपर्यंत आपला वाचक, हितचिंतक जोडण्याचे कार्य 'तरुण भारत च्या माध्यमातून उभे राहिले आहे. गावागावांची नाळ जोडून माणसांमध्ये चांगला संदेश पोहोचवण्याचे काम करत लाखो वाचकांच्या मनावर अधिराज्य 'तरुण भारत'ने गाजवले आहे. जिल्ह्यातील नगर पालिकांच्या राजकीय घडामोडीची सर्व इत्थंभूत माहिती वाचकांसमोर ठेवण्याचा 'तरुणभारत ने प्रयत्न केला.
त्याचबरोबर सामाजिक, राजकीय विषय अगदी उत्तम पद्धतीने हाताळले गेले आहेत. 'तरुण भारत संवाद'च्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित स्नेह मेळावा 'याची देही याची डोळा' पहावा असा होणार आहे. हा सोहळा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे. हा सोहळा सोमवार, दि. २९ रोजी सायंकाळी ५ वाजता राधिका पॅलेसच्या लॉनवर रंगणार आहे. या उपस्थित रहावे, असे आवाहन समूह प्रमुख किरण ठाकुर, कार्यकारी संचालक प्रसाद ठाकुर, संचालक सौ. सई ठाकुर-बिजलानी यांनी केले आहे.