आज कार्तिकी एकादशी
11:54 AM Nov 23, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
Tags :
Advertisement
पणजी : राज्यात आज कार्तिकी एकादशी उत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. या निमित्त राज्यातील विविध विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर महाअभिषेक होणार आहे. म्हापसा, ताळगाव, पणजी, आखाडा रायबंदर, सांखळी, सांगे, मडगाव इत्यादी ठिकाणच्या विठ्ठल मंदिरात आज विशेष अभिषेक तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. आजच्या कार्तिकी एकादशीने गेले चार महिने चालू असलेल्या चातुर्मासाची सांगता होणार आहे. आज श्री विठ्ठलाच्या नावे बहुतांश भाविक उपवास करणार आहेत.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article