जिल्ह्यात आज योगसत्रासोबतच पाणी, स्वच्छता उपक्रम
रत्नागिरी :
जगभरात आज योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त योग सत्राबरोबरच पाणी व स्वच्छतेचे विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहेत. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ यांच्या समन्वयाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचा दशकपूर्ती सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येत आहे. हा योग दिन कार्यक्रम जिल्ह्यात आज सकाळी ६.३० ते ७.४५ दरम्यान पार पडणार आहे. योग दिनानिमित्तचा हा कार्यक्रम योग प्रात्यक्षिकांची परंपरा पुढे नेण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे. हा योग दिनाचा कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समित्या तसेच आयुषमान आरोग्य मंदिर इत्यादींच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे. यासाठी ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समित्या यांनी क्यूआर कोड १ स्कॅन करून याबाबतच्या मानक कार्यप्रणालीबाबत माहिती तर इतर संदर्भ सामग्रीची माहिती क्यूआर कोड २ स्कॅन करून मिळवता येणार आहे. ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्या या उपक्रमांना हरित योग अंतर्गत योग दिनाच्या कार्यक्रमात एकत्रितपणे राबविता येणार आहे. योग संगमसाठी मानक कार्यप्रणाली माहिती व इतर संदर्भ साहित्य क्यूआर कोड ३ स्कॅन करून प्राप्त करता येणार आहे. कार्यक्रम क्र २-हरित योगमध्ये हरित योग उपक्रम पारंपरिक योगाभ्यासासोबत पर्यावरणीय शाश्वततेला देखील प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यावर्षीच्या योग दिनाच्या कार्यक्रमांतर्गत योग सत्रांबरोबरच समुदायाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणीय उपक्रमांचा समावेश केला जाणार आहे. यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात वॉश केंद्रित (पाणी, स्वच्छता व आरोग्य) दृष्टिकोन समाविष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून योग, आरोग्य व वॉश यांच्यातील संबंध अधोरेखित करणे सोपे होईल. सर्व ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समित्या यांनी योग फॉर वेल बिइंग अँड वॉश या संमेलनाचे आयोजन जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत मालमत्ता उपलब्ध आहेत अशा ठिकाणी करावे, असे सुचीत करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रम हरित योग किंवा योग संगम या मुख्य कार्यक्रमाशी सुसंगत असे असणार आहेत.
वॉश समीति व इतर जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ संबंधित लाभार्थ्यांची बैठक आयोजित करणे, कार्यक्रमाआधी परिसर व पाणी स्वच्छता आरोग्य संबंधित पायाभूत सुविधा स्वच्छ करणे, महत्त्वाच्या जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ मालमत्तांसमोर योग सत्र आयोजित करणे, समुदाय, योगक्रिया व योजनांची मालमत्ता दर्शविणाऱ्या स्पष्ट छायाचित्रांची नोंद केली जाणार आहे.