आज वारकरी तालावर भक्तीयोग चा विश्वविक्रम
सांगली :
जिल्हा परिषद, विश्व योग दर्शन केंद्र सांगली आणि चितळे डेअरी यांच्यावतीने शनिवारी (दि. २१) जून रोजी जिल्ह्यातील साडेपाच हजार केंद्रावर वारकरी तालावर भक्तियोग साजरा केला जाणार आहे. जिल्ह्यातील ६ लाखापेक्षा अधिक विद्यार्थी, नागरिक सामील होऊन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर या मुख्य केंद्राच्या माध्यमातून आभासी पद्धतीने एकावेळी व एकाथ तालावर योगासने केली जातील. भक्तियोगचा विश्वविक्रम करण्यासाठी जिल्हा सज्ज आला आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे या विश्वविक्रमात सहभागी होणार आहेत.
योगदिनी देशभरात आणि जगभरातही योगाचे विविध उपक्रम होतात. सांगली जिल्ह्यात याला विश्वविक्रमाचे स्वरुप देण्याचा संकल्प जिल्हा परिषदेसह संयोजकांनी केला आहे. त्याअंतर्गत वारकरी तालावर योगा केला जाणार आहे. सकाळी ८ ते ८.४० या चाळीस मिनिटांच्या कालावधीत जिल्लाभरातील साडेपाच हजार केंद्रांवर एकाचवेळी एकाच प्रकारची योगासने होतील, या उपक्रमात सहा लाखाहून अधिक नागरिक सहभागी होतील असे उष्टि ठेवण्यात आले आहे.
जिल्हाभरातील सर्व गावे आणि महापालिका क्षेत्रात हा उपक्रम होईल. सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ऐतिहासिक व अनोख्या उपक्रमाचे मुख्य केंद्र आहे. येथून जिल्ह्यातील सर्व केंद्र आभासी पद्धतीने जोडली जाणार असून नागरिकांचा भक्तियोगये संचलन व सनियंत्रण केले जाणार आहे.
शारीरिक व मानसिक आरोग्यास आवश्यक योग शैलीद्वारे समाजाचे आरोग्य वृद्धिंगत करण्यासाठी योगास अध्यात्मिक वारकरी संप्रदायाची भक्तिमय जोड देऊन नवे योग संस्करण निर्माण करण्यासाठी याचे आयोजन केले आहे. शाळा, महाविद्यालये, क्रीडांगणे, औद्यागिक व व्यापारी केंद्रे इत्यादी ठिकाणी विहित योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक पोशाखात (पांढरा कुर्ता, पायजमा, नऊवारी साड़ी किबा पांढरा पंजाबी ड्रेस) एकाच तालावर योगासने केली जाणार आहेत. उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना प्रशिक्षण देण्यासाठी दीड हजार योग प्रशिक्षक नियुफ केले आहेत.
शनिवार दि. २१ जून रोजी सकाळी ८.०० ते ८.४५ वाजता जागतिक योग दिन, योगिनी स्मार्त एकादशी व जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून बर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस, आशिया बुक ऑफ रेकॉर्डस आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद होणेसाठी भक्तियोग या ऐतिहासिक व अनोख्या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गोडमिसे, चितळे डेअरीचे संचालक गिरीष चितळे, बाळकृष्ण चिटणीस, रेणू अग्रवाल यांनी केले आहे.