पशुवैद्यकीय पर्यवेक्षकांना पशुगणती तांत्रिक प्रशिक्षण
एकही जनावर गणतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेणार
प्रतिनिधी / बेळगाव
पशुगणती सुरळीत पार पडावी यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत शुक्रवारी पशुवैद्यकीय पर्यवेक्षकांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. लाळ्या खुरकतमुळे लांबणीवर पडलेल्या पशुगणतीला प्रत्यक्षात प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्ह्यात 13 लाखांहून अधिक मोठ्या जनावरांची संख्या आहे. तर इतर जनावरेही अधिक प्रमाणात आहेत. या सर्व जनावरांची गणती केली जाणार आहे. विशेषत: ही गणती मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. एकही जनावर गणतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी खात्यामार्फत घेतली जाणार आहे.
पशुगणतीमुळे एकूण जनावरांची निर्दिष्ट संख्या समजणार
पशुगणतीमुळे एकूण जनावरांची निर्दिष्ट संख्या समजणार आहे. त्याबरोबर जनावरासाठी लागणारे औषध लसीकरण आणि इतर गोष्टींचा योग्य पुरवठा केला जाणार आहे. शिवाय शासनाच्या विविध सुविधा पुरविण्यासाठी पशुगणतीची मदत होणार आहे. यावेळी डॉ. आनंद पाटील यासह इतर अधिकाऱ्यांनी पर्यवेक्षकांना पशुगणतीच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासंदर्भात माहिती दिली.