For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पती शोधण्यासाठी...

06:30 AM Sep 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
पती शोधण्यासाठी
Advertisement

आपल्याला आदर्श जीवनसाथी मिळावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते, ही वस्तुस्थिती आहे. कित्येकजण अशा जोडीदाराच्या शोधात विवाह लांबवितात. विवाहासंबंधीच्या साईटस्, डेडिंग अॅप्स सोशल मिडिया प्लॅटफॉर्मस् अशी अनेक साधने आज पती किंवा पत्नीच्या शोधासाठी उपलब्ध आहेत. तरीही हवा तसा जीवनसाथी मिळाला नाही, तर अनेक अद्भूत, कित्येकदा विचित्र वाटावेत, असे उपाय केले जातात. सध्या अशाच एका उपायाची चर्चा सोशल मिडियावर होत आहे. अमेरिकेत राहणाऱ्या एका प्रौढ, 42 वर्षीय महिलेने हा उपाय केला आहे.

Advertisement

लिसा कॅटॅलानो असे या महिलेचे नाव आहे. ती अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांताची रहिवासी आहे. तिला तिच्या मनासारखा आदर्श पती हवा आहे. अनेक वर्षे ती अशा पतीच्या शोधात आहे. तथापि, तिला तो मिळालेला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी तिने जो मार्ग अवलंबिला आहे, त्याची कल्पनादेखील कोणी सर्वसामान्य विवाहेच्छू करु शकणार नाही. तिने पती हवा असल्याची जाहीरात चक्क एका होर्डिंगच्या स्वरुपात महामार्गावर केली आहे. तिने ही जाहीरात करण्यासाठी कॅलिफोर्नियतातील महामार्ग क्रमांक 101 वर डझनभर डिजिटल बिलबोर्ड भाड्याने घेतले आहेत. या बोर्डांवर तिने आपल्याला पती हवा असल्याची जाहीरात केली आहे. जाहीरातींमध्ये तिने आपल्या वेबसाईटचा पत्ताही दिला असून तिच्याशी विवाह करण्याची इच्छा असणारा कोणीही पुरुष या वेबसाईटवर तिला भेटू शकतो. आपपण ‘प्रथम भेटीत प्रेम’ या तत्वावर विश्वास ठेवतो, असेही तिने स्पष्ट पेले आहे. तिला कसा पती हवा आहे, याची माहिती तिच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. ‘कोणत्याही परिस्थितीत मला लग्न करायचेच आहे आणि तेही मला आवडलेल्या पुरुषाशीच’ असा निर्धारही तिने जाहिरातींमध्ये व्यक्त केला आहे. मी महामार्गावर प्रदर्शित केलेली होर्डिंग्ज हा केवळ गमतीचा भाग, किंवा केवळ एक प्रसिद्धी स्टंट म्हणून कोणी दुर्लक्षित करु नये. मी माझ्या विवाहाविषयी अत्यंत गंभीर आहे. तिचे हे पती शोधण्याचे ‘अभियान’ कॅलिफोर्नियातील सांता क्लारा पासून सॅनफ्रान्सिस्कोपर्यंतच्या जवळपास 45 चौरस मैलांच्या परिसरात विस्तारले आहे. पती शोधण्याचा हा प्रकार कदाचित जगातील प्रथमच असावा.

Advertisement
Advertisement
Tags :

.