For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘टीएमसी’ची दडपशाही, अत्याचारांचा झाला अंत!

01:13 PM May 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘टीएमसी’ची दडपशाही  अत्याचारांचा झाला अंत
Advertisement

डॉ. श्यामाप्रसादांच्या भूमीत त्यांच्या विचारांचे सरकार

Advertisement

पणजी : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये जी दडपशाही सुरू होती, जे अत्याचार देशभक्त जनतेवर तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांवर होत होते, त्या सर्वांचा आता अंत झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपाला यश मिळाले आहे. आता विकासाची गंगा पश्चिम बंगालमध्ये वाहू लागेल. भाजपचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या भूमीत त्यांच्या विचारांचे सरकार आले आहे, याचा आनंद होत आहे, असे प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगाल येथील दडपशाहीला आणि गुंडगिरीला राज्यातील जनता वैतागली होती. त्यांना या जाचातून बाहेर काढण्याचे काम आता भाजप सरकार करणार आहे. कारण बंगालच्या जनतेने दाखवलेला विश्वास हा लोकांच्या कल्याणासाठी आहे आणि त्यांचे कल्याण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार नक्कीच करेल, असा विश्वासही प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केला.

Advertisement
Advertisement
Tags :

.