दिल्लीत ‘आप’ला टीएमसीचा पाठिंबा
केजरीवालांनी ममतांना दिले धन्यवाद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला आहे. ममतादीदींच्या या निर्णयानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी ‘धन्यवाद दीदी’ असे ट्विट करत त्यांचे आभार मानले.
तृणमूल काँग्रेसने दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. मी वैयक्तिरित्या ममतादीदींचा ऋणी आहे. आमच्या चांगल्या आणि वाईट काळात तुम्ही नेहमीच आम्हाला साथ आणि आशीर्वाद दिला, असेही केजरीवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले केले. केजरीवाल यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना टीएमसीचे ज्येष्ठ नेते डेरेक ओब्रायन यांनी ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत’ असे स्पष्ट केले. तर कुणाल घोष यांनी दिल्लीतील जनता विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करेल. ‘आप’चे सरकार परत येईल, असा दावा केला.