For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेजस विमान अपघातग्रस्त तर होणार नाही ना? तृणमूल खासदाराची मोदींवर टीका

05:47 PM Nov 27, 2023 IST | Kalyani Amanagi
तेजस विमान अपघातग्रस्त तर होणार नाही ना  तृणमूल खासदाराची मोदींवर टीका
Advertisement

भारताने वर्ल्डकपची फायनल हरल्यापासून मोदींवर पनवती अशी टीका केली जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही मोदींना पनवती असे संबोधले आहे. यातच मोदींनी तेजस लढाऊ विमानातून सैर केल्यामुळे विरोधक मोदींवर टीकेचा भडिमार करत आहे. दरम्यान तृणमूलचे खासदार शांतनू सेन यांनी मोदी ज्या तेजस विमानात बसले ते विमान अपघातग्रस्त तर होणार नाही ना? अशी खोचक टीका केली आहे.

Advertisement

जेव्हा मोदी देशात होते, तेव्हा इस्रोचे मिशन फेल झाले. जेव्हा कंगना मोदींना भेटली, तेव्हा तिचा सिनेमा सुपर फ्लॉप झाला. जेव्हा विराट कोहलीने मोदींशी हात मिळविला तेव्हा सलग तीन वर्षे त्याला शतकच ठोकता आले नाही, वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ सलग १० सामने जिंकत होता, परंतू मोदी त्या स्टेडिअममध्ये गेले आणि फायनल हरला, असे सांगताना मला भीती वाटतेय की मोदी तेजस विमानात बसले, आता ते लवकरच अपघातग्रस्त होणार तर नाही ना... असे सेन म्हणाले आहेत.

यावर हे लोक केवळ पंतप्रधान मोदींचा द्वेष करत नाहीत तर त्यांना देशाचे कल्याणही नको आहे, अशी टीका भाजपाने केली आहे. भाजपाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.