For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रायबाकिनाला जेतेपद

06:48 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
रायबाकिनाला जेतेपद
Advertisement

वृत्तसंस्था/ अबू धाबी

Advertisement

अग्रमानांकित इलेना रायबाकिनाने रशियाच्या दारिया कॅसात्किनाचा पराभव करून येथे झालेल्या अबू धाबी ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या मोसमातील तिचे हे दुसरे जेतेपद आहे.

रायबाकिनाने कॅसात्किनाचा 6-1, 6-4 असा पराभव केला. 2022 मध्ये विम्बल्डनचे जेतेपद मिळविलेल्या रायबाकिनाचे हे कारकिर्दीतील एकूण सातवे अजिंक्यपद आहे. या सामन्यात काही वेळ पावसाचा व्यत्यय आला होता. तिने पहिला सेट आरामात जिंकला. पण दुसऱ्या सेटमध्ये कॅसात्किनाने बऱ्यापैकी प्रतिकार केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.