टायटन कंपनीला 1047 कोटींचा नफा
नवी दिल्ली :
टाटा समूहातील कंपनी टायटनने 31 डिसेंबरला संपलेल्या तिमाहीमध्ये 1047 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी समान अवधीमध्ये कंपनीने 1053 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. सोन्यावरील सीमा शुल्कामध्ये करण्यात आलेल्या बदलामुळे कंपनीला वरील नफा प्राप्त करता आला आहे.
17 हजार कोटीचे उत्पन्न
टाटा समुहातील या कंपनीने सदरच्या तिमाहीमध्ये 17723 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न मिळविले आहे. उत्पन्नामध्ये 25 टक्के वाढ नोंदविली आहे. मागच्या वर्षी समान अवधीत 14122 कोटी रुपये उत्पन्न कंपनीने मिळविले होते. याच दरम्यान 27 टक्के वाढीसह 16688 कोटी रुपयांचा महसुल कंपनीने प्राप्त केला आहे.
काय म्हणाले एमडी
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सी. के. व्यंकटरामन म्हणाले की, सदरच्या तिमाहीमध्ये उत्सवी हंगाम असल्याकारणाने कंपनीला आर्थिक वर्ष 2025 मध्ये विकास साधता आला आहे. पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीने फारशी चांगली चमक दाखविली नव्हती. दागिन्यांच्या विक्री मागच्या तिमाहीमध्ये चांगली झाली होती. ज्यामुळे नफ्यामध्ये कंपनीला चांगली कामगिरी पार पाडता आली. घड्याळाचा व्यवसायही 20 टक्के इतका वाढीव राहिला होता.