महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये भेसळ उघड

07:05 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडून चरबी असल्याची पुष्टी : राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू, सीबीआय चौकशीची मागणी

Advertisement

वृत्तसंस्था/हैदराबाद, नवी दिल्ली

Advertisement

तिरुपती मंदिरातील लाडू आणि अन्नदानमच्या नमुन्यांच्या तपासणीत नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या अहवालात खळबळजनक खुलासे झाले आहेत. लाखो लोकांच्या श्र्रद्धेचे केंद्र असलेल्या तिरुपती तिरुमला मंदिरात मिळणाऱ्या लाडूंमध्ये भेसळ होत असल्याचे समोर आले आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने (राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ) लाडूंमध्ये चरबी आणि गोमांस असल्याची पुष्टी केली आहे. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या अहवालात खळबळजनक खुलासे करण्यात आले आहेत. बोर्डाच्या अहवालानुसार, तिरुपती मंदिरातील लाडू बनवण्यासाठी फिश ऑईल, बीफ आणि फॅटचा वापर करण्यात आला आहे. यात आश्चर्याची बाब म्हणजे हे लाडू केवळ प्रसाद म्हणून भक्तांमध्येच वाटले जात नव्हते तर ते देवालाही अर्पण केले जात होते.

भेसळीचा हा प्रकार उघड झाल्यानंतर तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंवरून आंध्र प्रदेशात राजकीय वादळ उठले आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी वायएस जगन मोहन रेड्डी यांना कोंडीत पकडत मागील वायएसआरसीपी सरकारने तिऊमला येथे तिऊपती लाडू प्रसादम तयार करण्यासाठी तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरल्याचा आरोप केला. हा प्रसाद भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात येणाऱ्या करोडो भाविकांना दिला जातो.

सध्या लाडू तयार करण्यासाठी आता शुद्ध तुपाचा वापर केला जात आहे आणि मंदिरातील प्रत्येक वस्तू स्वच्छ करण्यात येत असल्यामुळे गुणवत्ता सुधारल्याचे स्पष्टीकरण अमरावती येथे एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिल. आंध्रप्रदेशचे आयटी मंत्री नारा लोकेश यांनी ‘एक्स’वर चंद्राबाबू नायडू यांची टिप्पणी शेअर करताना जगनमोहन रेड्डी यांना या मुद्यावर लक्ष्य केले. यापूर्वीच्या जगन प्रशासनाने तिरुपती प्रसादममध्ये तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली हे जाणून मला आश्चर्य वाटले. करोडो भाविकांच्या धार्मिक भावनांचा आदर न करू शकणाऱ्या जगन आणि वायएसआरसीपी सरकारने याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे म्हटले आहे.

या आरोपांना उत्तर देताना आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष वायएस शर्मिला यांनी ‘एक्स’वर चंद्राबाबू नायडू यांनी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी आणि सीबीआयला सत्य शोधू द्यावे, असे म्हटले आहे. दुसरीकडे, वायएसआरसीपीचे राज्यसभा खासदार वाय. व्ही. सुब्बा रे•ाr यांनीही या वादावर प्रतिक्रिया देत चंद्राबाबू नायडू राजकीय फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. नाहक आरोप करून मुख्यमंत्र्यांनी तिरुमला मंदिराचे पावित्र्य आणि कोट्यावधी हिंदूंच्या श्र्रद्धेला धक्का पोहोचवला आहे, असेही ते म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article