For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिरोडा जि. परिषद शाळॆत वर्तमानपत्र दिन साजरा

11:58 AM Feb 01, 2025 IST | अनुजा कुडतरकर
तिरोडा जि  परिषद शाळॆत वर्तमानपत्र दिन साजरा
Advertisement

न्हावेली / वार्ताहर
राष्ट्रीय वर्तमानपत्र दिनानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक तिरोडा नंबर १ शाळेत विविध वर्तमानपत्राचे वाचन करुन वर्तमानपत्र दिन साजरा करण्यात आला.तिरोडा नंबर एक शाळेचे उपक्रमशील शिक्षक दिपक राऊळ यांनी मुलांना वाचनाची गोडी निर्माण करुन वर्तमानपत्राच्या माध्यमातून मुलांचे चौफेर ज्ञान वाढविण्यासाठी तसेच त्यातून मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी परिपाठाच्या माध्यमातून वर्तमानपत्र वाचन हा उपक्रम घेतला . वर्तमानपत्रातून मुलांना कला,क्रिडा,साहित्य,सांस्कृतिक आणि अद्यावत ज्ञान मिळाल्यामुळे त्यातून स्पर्धा परिक्षेची तयारी होण्यास मदत होते.दिपक राऊळ सरांनी यापूर्वी पुस्तकभिशी या उपक्रमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विचारात घेऊन अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी मुलांनी अभिव्यक्त व्हावे हा स्तुत्य उपक्रम राबविला होता.या उपक्रमाची नोंदही घेण्यात आली आहे.यावेळी शिक्षक जनार्दन प्रभू तसेच भाग्यश्री परब,आर्या आडारकर,सिया आडेलकर,सिताराम गोडकर,यश केरकर,हस्तिका आडारकर,अन्वित जाधव,काव्या साठेलकर,दत्ताराम गावडे इत्यादी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

Advertisement

Advertisement
Tags :

.