महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

एक्सल तुटल्याने टायर झाले बसपासून वेगळे

10:40 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जामगाव बस शेळेगाळीजवळ कलंडली : चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला  

Advertisement

खानापूर : खानापूर आगाराची बस क्रमांक के 22 एफ 363 ही रोजच्याप्रमाणे सकाळी 8 वाजता जामगाव येथे गेली होती. जामगावहून परत येताना शेडेगाळी जवळ या बसचे मागील टायरचे एक्सल तुटल्याने दोन्ही टायर बसपासून बाजूला निखळून पडल्याने बस रस्त्याच्या शेजारील गटारीत कलंडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बस रस्त्याच्या कडेला कलंडली. मात्र, प्रवासी असून देखील कोणालाही मोठी दुखापत झाली नाही. चालकाच्या सावधगिरीमुळे मोठा अनर्थ टळला. आज रविवार असल्याने या बसमध्ये विद्यार्थ्यी नव्हते. बाजारासाठी येणाऱ्या लोकांची या बसमध्ये किरकोळ गर्दी होती. खानापूर आगारात ग्रामीण भागासाठी जुन्या मोडकळीस आलेल्या बसेस वापरण्यात येत आहेत. त्यामुळे वारंवार असे छोटे-मोठे अपघात होत आहेत. यामुळे तालुक्यात संताप व्यक्त होत आहे. ग्रामीण प्रवाशांच्या जीवाशी खेळ चालवल्यासारखाच हा प्रकार आहे. खानापूर तालुक्यातील संपूर्ण ग्रामीण भागात सोडलेल्या सर्व बसेस अत्यंत जुनाट आणि पूर्णपणे नादुरुस्त असून, त्या बस वाहतुकीसाठी वापरण्यात येत आहेत. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी याबाबत परिवहन मंत्र्यांकडे याचा पाठपुरावा करून खानापुरातील ग्रामीण भागासाठी चांगल्या  सुस्थितीतील बस वापरण्यात येण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आह

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article