महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काळसे गावात भाजपला खिंडार ; राणे समर्थकांसह कार्यकर्ते ठाकरे गटात

04:36 PM Nov 05, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

घराणेशाहीला कंटाळून भाजप सोडतोय ; प्रवेशकर्त्यांची प्रतिक्रिया

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

Advertisement

विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये उमेदवारी वरुन सिंधुदुर्गात घराणेशाही सुरू आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी आपले पुत्र नितेश राणे यांना कणकवली विधानसभेमधुन उमेदवारी दिली आहे तर दुसरे पुत्र निलेश राणे यांना महायुतीमधुन कुडाळ विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या घराणेशाहीला कंटाळून भाजप-शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत.काल मालवण तालुक्यातील काळसे गावातील परबवाडी व रमाईनगर मधील कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांसह ग्रामपंचायत सदस्य सुशिल काळसेकर यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत मशाल हाती घेतली आहे.आ.वैभव नाईक यांनी सर्व प्रवेशकर्त्यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.

यावेळी बोलताना प्रवेशकर्ते म्हणाले राणे पिता-पुत्र व त्यांचे समर्थक हे केवळ निवडणुकीपुरते वाडीवर पैसे घेऊन येतात व कोणतीही विकासकामे करत नाहीत तर या उलट आमदार वैभव नाईक यांनी काळसे गावामध्ये लाखो रुपयांची विकास कामे मार्गी लावली आहेत.त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व कार्य प्रणालीवर प्रेरित होऊन आपण त्यांचे नेतृत्व स्वीकारले आहे.तसेच महायुतीमध्ये नारायण राणे विद्यमान खासदार असुन देखील महायुतीने नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांना कुडाळ मधुन उमेदवारी तर दुसरे पुत्र नितेश राणे यांना कणकवली मधुन उमेदवारी दिली आहे ही घराणेशाही आपल्याला मान्य नसुन अशाने सामान्य कार्यकर्ता कधीच वर येणार नाही.ही घराणेशाही आपल्याला मान्य नसल्यामुळेच आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत असल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले आहे.

यावेळी परबवाडी येथील कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्ते राजेश परब, रोहित परब, रोहन परब, समीर परब,तुळशीदास परब, संदेश परब, गौरेश परब, चिन्मय परब, प्रविण परब, सुधीर प्रभु, गोविंद खानोलकर, परशुराम परब, बुधाजी परब,पांडुरंग परब,प्रशांत प्रभू,जितेंद्र बागवे,रमेश परब,दीपक प्रभू,विश्वनाथ परब,जनार्दन परब,चंद्रकांत बागवे, प्रमोद परब,मालती परब, संतोष परब, भावेश परब,अवधूत परब अनिल परब तर रमाईनगर येथे ग्रामपंचायत सदस्य सुशील काळसेकर, मनोहर काळसेकर, प्रशांत काळसेकर,रुपेश काळसेकर, सुनील काळसेकर, अक्षय परुळेकर,अक्षय काळसेकर, अजय काळसेकर, आनंद काळसेकर,विवेक काळसेकर, दीपक काळसेकर, महेश काळसेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, पेंडूर विभाग प्रमुख शिवा भोजने, अनिल परब, बाबू टेंबुलकर,रुपेश आमडोसकर,निनाक्षी शिंदे,दिपक बागवे, दर्शन म्हाडगुत,शेखर रेवडेकर, ग्रामपंचायत सदस्य मोनिका म्हापणकर,चंद्रकांत राऊळ, शाखाप्रमुख विनोद परब,उपविभाग प्रमुख उमेश प्रभू, राजेश परब,शिवनंदन प्रभू,अण्णा गुराम,अजित प्रभू,सुनील परब,शंकर परब ग्रा. सदस्य भाग्यश्री काळसेकर, दीपिका म्हापणकर,जागृती भोळे,हेमंत गुराम, संतोष कदम,प्रभाकर गोसावी आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Advertisement
Tags :
# tarun bharat news sindhudurg# konkan update # news update # mararthi news #
Next Article