कॅन्टोन्मेंट शाळांच्यावतीने तिरंगा रॅली
06:12 AM Aug 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
त. भा. प्रतिनिधी
Advertisement
बेळगाव
बेळगाव कॅन्टोन्मेंट शाळांच्यावतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शनिवारी तिरंगा रॅली काढण्यात आली. हातामध्ये तिंरगा ध्वज घेऊन विद्यार्थी ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत सहभागी झाले होते. कॅम्पच्या विविध भागातून ही तिरंगा रॅली काढण्यात आली.
Advertisement
कॅन्टोन्मेंटच्या मराठी, ऊर्दू व इंग्रजी माध्यम शाळांचे विद्यार्थी या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले होते. नागरिकांमध्ये स्वातंत्र्यदिनाविषयी जागृती व्हावी या उद्देशाने ही तिरंगा रॅली काढण्यात आली. यामध्ये शाळांचे शिक्षक तसेच कॅन्टोन्मेंटचे कर्मचारी सहभागी झाले होते.
Advertisement