For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सभापतींसह अन्यजणांना अडकविण्यासाठी 'टिप' दिली ! ठाकरे शिवसेनेचा गौप्यस्फोट, सत्ताधाऱ्यांत दोन गट

04:12 PM Sep 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
सभापतींसह अन्यजणांना अडकविण्यासाठी  टिप  दिली   ठाकरे शिवसेनेचा गौप्यस्फोट  सत्ताधाऱ्यांत दोन गट
Advertisement

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेत सत्ताधारी भाजपच्या दोन गटांतर्गत राजकारणातून पाणीपुरवठा विभागाच्या सभापतींसह अन्य काहीजणांची नावे घेण्यासाठी 'टिप' दिली गेल्याचा गौप्यस्फोट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक देवा टेमकर यांनी केला. तर समितीचा सदस्य म्हणून आम्ही हा घोटाळा होण्यापासून रोखल्याचे सांगत या घोटाळ्याला जबाबदार असलेल्या पाणीपुरवठा विभागातील दोषींवरही कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

Advertisement

टेमकर पुढे म्हणाले, सत्ताधाऱ्यांतील गटबाजीचा परिणाम शहरातील विकासकामांवर होत आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागात १७ लाखांचा घोटाळा झाला असून समिती सदस्य म्हणून तो होण्याआधी आम्ही रोखला. यातील चौकशीत जोडारी दोषी आढळला असून इतरही लोकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, यामागे कोण आहे, याचाही शोध लावावा. जोडारी व अन्य कर्मचाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही नगराध्यक्ष व सभापतींकडे केली होती. तसा ठराव घेऊन नगरपालिकेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. मुख्याधिकाऱ्यांकडूनही बिल काढण्यासाठी दबाव आणला जात होता. मात्र, आम्ही आक्षेप घेतल्याने बिल अदा करण्यात आले नाही. या घोटाळ्याच्या ऑडिटसाठी पुरवठाधाराकडून दीड लाख रुपये घेतल्याचा आरोपही टेमकर यांनी यावेळी केला. दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी टेमकर यांनी केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.