For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राष्ट्रपती मुर्मू यांना तिमोर लेस्टेचा पुरस्कार

06:32 AM Aug 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
राष्ट्रपती मुर्मू यांना तिमोर लेस्टेचा पुरस्कार
Advertisement

दोन देशांदरम्यान तीन करारांवरही स्वाक्षऱ्या

Advertisement

वृत्तसंस्था/ दिली

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिवारी आपल्या विदेश दौऱ्यादरम्यान तिमोर लेस्टेची राजधानी दिली येथे पोहोचल्या. सध्या त्या आपल्या तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. तिमोर लेस्टे येथे राष्ट्रपती जोस रामोस होर्टा यांनी विमानतळावर एका विशेष समारंभात त्यांचे स्वागत केले. राष्ट्रस्तरीय अतिथी म्हणून तिमोर लेस्टेला भेट देणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. याप्रसंगी त्यांना तिमोर लेस्टेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशाचे राष्ट्रपती जोस रामोस होर्टा यांच्या हस्ते त्यांना ‘ग्र्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर लेस्टे’ने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती मुर्मू यांनी नंतर तिमोर लेस्टेचे पंतप्रधान राला झानाना गुस्माओ यांची भेट घेतली. याप्रसंगी तिमोर लेस्टेचे पंतप्रधान आणि भारतीय राष्ट्रपती यांच्या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये तीन करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

Advertisement

राष्ट्रपती मुर्मू 5 ते 10 ऑगस्ट 2024 या कालावधीत फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर-लेस्टे या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. प्रथम त्यांनी फिजी (5-7 ऑगस्ट), नंतर न्यूझीलंड (8 आणि 9 ऑगस्ट) ला भेट दिली आणि शेवटच्या टप्प्यात 10 ऑगस्ट रोजी त्या तिमोर लेस्टेला पोहोचल्या. त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू यांच्यासोबत केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार आणि मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचे राज्यमंत्री जॉर्ज कुरियन आणि लोकसभेचे दोन खासदार सौमित्र खान आणि जुगल किशोर हेही सहभागी झाले होते.

Advertisement
Tags :

.