महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शहरात टिमक्या विक्रेते दाखल

10:56 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गल्लोगल्ली घुमतोय आवाज : बालचमूंना आकर्षण

Advertisement

बेळगाव : होळी, रंगपंचमी आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरात विक्रीसाठी टिमक्या दाखल होऊ लागल्या आहेत. काही किरकोळ विक्रेते गल्लोगल्ली टिमक्या घेऊन विक्रीसाठी फिरताना दिसत आहेत. बाजारातही टिमक्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. बालचमूंसाठी या टिमक्या आकर्षण ठरू लागल्या आहेत. सध्या इंटरनेट आणि मोबाईलचा जमाना असला तरी पारंपरिक सण आणि वाद्यांचे महत्त्व अद्यापही टिकून आहे. होळी आणि रंगपंचमी सणांमध्ये बालचमूंकडून टिमक्यांचा आवाज घुमतो. यासाठी शहरासह ग्रामीण भागातही टिमक्या विक्रेते दाखल होऊ लागले आहेत. टिमक्यांचा आवाज घुमू लागल्याने होळीचा सण जवळ आल्याची चाहूल सर्वांना लागली आहे. विविध आकारामध्ये टिमक्या विक्री होऊ लागल्या आहेत. 200 ते 300 रुपयांपर्यंत याच्या किमती आहेत. शहरासह उपनगरांतील विविध भागांमध्ये टिमक्यांचा आवाज काढत विक्रेते भर उन्हातही फिरू लागले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article