For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गॅस विझले ,चुली पेटल्या !

12:50 PM Mar 27, 2026 IST | अनुजा कुडतरकर
गॅस विझले  चुली पेटल्या
Advertisement

सातार्डातील हॉटेल व्यावसायिकांवर चुलीवर भजी , वडे तळण्याची वेळ

Advertisement

सातार्डा -

गॅस सिलिंडर वेळेत भरून मिळत नसल्याने सातार्डा पंचक्रोशीतील हॉटेल व्यावसायिक संकटात सापडले आहेत.मिर्ची, वडापाव हॉटेल व्यावसायिक मोहन पेडणेकर चुलीवर कढईमध्ये वडे, मिर्ची तळून ग्राहकांना देत आहेत.याआधी हॉटेल व्यावसायिकांकडे गॅस सिलिंडर उपलब्ध होते. मात्र हळूहळू गॅस सिलिंडर संपल्याने हॉटेल बंद ठेवण्याची वेळ हॉटेल व्यावसायिकांवर आली आहे. परिसरात चवदार भजी, रुचकर भाजी, ऑम्लेट विविध प्रकारचे खाद्य पदार्थ माफक दरात ग्राहकांना मिळत होते.लगतच्या गोवा राज्यातील नागरिक,कामावरून घरी परतणारे कामगार दररोज पंचक्रोशीतील हॉटेलमधील पदार्थांचा आस्वाद घेतात.गॅस सिलेंडर संपल्याने काही हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत. तर काहींनी गॅस सिलिंडर वेळीच मिळत नसल्याने पर्याय म्हणून चुलीवर हॉटेल्स सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.