For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Chandgad News | शेतात जाताना वाटेतच काळ आडवा आला! चंदगडमधील 'त्या' अज्ञात वाहनाचा थरार; बाप-लेक रक्ताच्या थारोळ्यात

01:36 PM Jun 01, 2026 IST | NEETA POTDAR
chandgad news   शेतात जाताना वाटेतच काळ आडवा आला  चंदगडमधील  त्या  अज्ञात वाहनाचा थरार  बाप लेक रक्ताच्या थारोळ्यात
Advertisement

                  पारगड फाट्याजवळ भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक;

Advertisement

चंदगड -पारगड फाट्याजवळ भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने बाप-लेक जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी चंदगडपोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा लक्ष्मण कदम (वय २३, रा. कलिवडे, पोस्ट आंबेवाडी, ता. चंदगड) यांनी फिर्याददिली आहे. श्रद्धा कदम व तिचे वडील लक्ष्मण कदम हे दुचाकीवरून हेरे गावातील शेतात पिकांना पाणी सोडण्यासाठी जात होते. मोटणवाडी ते चंदगड मार्गावरील पारगड फाट्याजवळ ते पोहोचले असता,चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

Advertisement

यात लक्ष्मण कदम यांच्या उजव्या खांद्याला, कपाळावर तसेच उजव्या पायाच्या घोट्याला गंभीर दुखापत झाली. तर श्रद्धा कदम यांच्या दोन्ही तळहातांना, हनुवटीवर, डोक्याच्या उजव्या बाजूस व गुडघ्याला किरकोळ जखमा झाल्या आहेत.

Advertisement
Tags :

.