For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pandharpur | शेताला पाणी देताना काळाचा घाला; पळशीतील घटनेत २४ वर्षांच्या होतकरू शेतकऱ्याने गमावला जीव

03:05 PM Aug 24, 2026 IST | NEETA POTDAR
pandharpur   शेताला पाणी देताना काळाचा घाला  पळशीतील घटनेत २४ वर्षांच्या होतकरू शेतकऱ्याने गमावला जीव
Advertisement

पंढरपूर | पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील युवा शेतकरी गणेश शेंडगे (वय २४, रा. गादेगाव, ता. पंढरपूर) यांचा पळशी येथील आपल्या शेतात पाण्याची मोटार सुरू करीत असताना अचानक विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. एका तरुण होतकरू आणि कष्टाळू शेतकऱ्याचा असा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

शेतामध्ये सतत नवनवीन प्रयोग करत प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचे नाव घेतले जात असे. ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी सहा वाजता घडली.

गादेगाव येथील युवा शेतकरी गणेश शेंडगे यांची पळशी येथे शेती आहे. पिकाला पाणी देण्यासाठी ते मोटारसुरू करण्यासाठी गेले तेव्हा उजव्या हाताला विजेचा शॉक बसला आणि ते वेगाने बाजूला पडले. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Advertisement

गादेगाव येथे ही घटना समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. एका जिज्ञासू युवा शेतकऱ्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. या अगोदर पंढरपूर तालुक्यातील आंबे या गावातही काही दिवसांपूर्वी ऐन वटपौर्णिमेच्या दिवशी शेतकरी दांपत्याचा शेतीला पाणी देताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता.

Advertisement
Tags :

.