Miraj News | बाळूमामाच्या दर्शनापूर्वीच काळाचा घाला; मिरजेत दुचाकीची टँकरला धडक, तरुण ठार
मिरज-आदमापूर रस्त्यावर दुचाकी-टँकर अपघात
मिरज - बाळूमामाच्या दर्शनासाठी आदमापूरकडे जात असताना भरधाव दुचाकीची टँकरला पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात दिनेश बाळासाहेब माने हे दुचाकीस्वार ठार झाले. तर गणेश विलास दाईंगडे (वय २७, रा. कोळेगांव, मोहोळ, जि. सोलापूर) हे जखमी झाले आहेत. याबाबत गणेश यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली असून, संशयीत टेंकर चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अ-शी, मयत दिनेश माने व त्यांचे मित्र गणेश दाईंगडे असे दोघेजण (एमएच-१३-ईटी-९३८४) या दुचाकीवरुन संत बाळूमामा दर्शनासाठी आदमापूरकडे जात होते. ते भोसे गावच्या हद्दीत खंडोबा रोप-वाटीका समोर आल्यानंतर संशयीत अनोळखी टैंकर चालक (टीएस-०६-युए-२४०६) वरुन रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर झाडांना पाणी घालत होता. मात्र, सदर टैंकर हा मिरजच्या दिशेने तोंड करुन चुकीच्या लेनवर थांबला होता.
दिनेश माने हे निर्धारीत लेनवरुन येत असताना अचानक टैंकर आडवी आली. त्यामुळे टँकरला पाठीमागून दुचाकी जोरात धडकली. या अपघातात दुचाकीस्वार दिनेश माने हे गंभीर जखमी होऊन प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने ठार झाले. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेले गणेश दाईंगडे हे जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मयत व्यक्तीच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली. चुकीच्या लेनवर टैंकर थांबविल्याने अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. पो-'लिसांनी करुन टैंकर चालकावर गुन्डा दाखल केला आहे.