For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Jejuri Warkari Accident | जेजुरीत वारकऱ्यांवर काळाचा घाला; भीषण अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू

10:07 AM Jul 13, 2026 IST | NEETA POTDAR
jejuri warkari  accident   जेजुरीत वारकऱ्यांवर काळाचा घाला  भीषण अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Advertisement

जेजुरी - काही दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे.. त्यासाठी राज्यभरातुन वारकरी चालत पंढरीच्या दिशेने निघाले आहेत.. कुणी पायी तर कुणी गाड्यांवरुन ... सगळीकडे आंनदाचे वातावरण असतानाचं आता जेजुरीतुन एक दुखद बातमी समोर येत आहे.. जेजुरीत वारकऱ्यांच्या भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

Advertisement

या दुर्दैवी घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ज्या ट्रकने वारकऱ्यांना उडवले तो ट्रक वारकऱ्यांचे सामान वाहून नेणारा होता. या अचानक झालेल्या अपघातामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

समोर आलेल्या माहीतीनुसार, जेजुरी परिसरातील भोंगळे मळा वारकऱ्यांच्या अपघात झाला.आज सकाळी ज्ञानोबा माऊलींची पालखी सासवडहून जेजुरीला जाणार आहे. या पालखीच्या आधी काही वारकरी पुढच्या मुक्कामाच्या दिशेने निघतात. आज सकाळी हे वारकरी रस्त्यावरुन चालत असताना सामान वाहून नेणार एक ट्रक वारकऱ्यांच्या गर्दी शिरला. या ट्रकने पाठून सहा वारकऱ्यांना जोरदार धडक दिली. हे सर्व वारकरी आनंदाच विठुनामाचा गजर करत चालत होते.

Advertisement

मात्र, या अपघातानंतर घटनास्थळी किंकाळ्या आणि रडण्याचे सूर ऐकायला येत होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. यामध्ये सहा वारकरी जखमी झाले आहेत. . यापैकी तीन वारकऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.तर यापैकी तीन महिलांचा मृत्यू झाला आहे

म्हणुन अपघात घडला.... 

सदर ट्रक नांदेडचा  असुन. ट्रकचा ड्रायव्हर 70 वर्षे वयाचा होता. ट्रक ड्रायवरने तापाच्या गोळ्या घेतल्यानं ग्लानी आली. त्यानंतर ड्रायवरचा ट्रकवरील ताबा सुटला आणि थेट पुढे चालणाऱ्या वारकऱ्यांच्या अंगावर गेला, अशी माहिती पुरंदरचे आमदार विजय शिवतारे

Advertisement
Tags :

.