टिम वाल्ज डेमोक्रेटिक पार्टीचे उपाध्यक्ष पदाचे उमेदवार
कमला हॅरिस यांच्याकडून घोषणा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत 5 नोव्हेंबर रोजी अध्यक्षीय पदासाठी निवडणूक होणार आहे. डेमोक्रेटिक पार्टीच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून टिम वाल्ज यांची निवड केली आहे. टिम वाल्ज हे मिनेसोटाचे गव्हर्नर आहेत. उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी पेंसिल्वेनियाचे गव्हर्नर जोश शापिरो हे देखील इच्छुक होते.
टिम वाल्ज हे अध्यक्ष जो बिडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात खराब कामगिरीनंतरही जो बिडेन यांची वाल्ज यांनी पाठराखण केली होती. बिडेन हे अध्यक्षीय पदाच्या उमेदवारीतून बाजूला झाल्यावर टिम वाल्ज यांनी कमला हॅरिस यांचे समर्थन केले होते.
राजकारणात येण्यापूर्वी टिम वाल्ज हे मिनेसोटाच्या मॅनकॅटोमध्ये एक हायस्कूल शिक्षक आणि फुटबॉल कोच होते. टिम वाल्ज यांनी 24 वर्षांपर्यंत आर्मी नॅशनल गार्डमध्ये देखील काम केले आहे. 2018 मध्ये टिम हे मिनेसोटाचे गव्हर्नर म्हणून निवडून आले होते.