For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टिम बर्टन अन् मोनिका यांचा ब्रेकअप

06:23 AM Oct 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
टिम बर्टन अन् मोनिका यांचा ब्रेकअप
Advertisement

चित्रपट दिग्दर्शक टिम बर्टन आणि इटलीची सुंदर अभिनेत्री मोनिका बेलुची मागील दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्य होते. परंतु आता दोघांनी हे नाते संपुष्टात आणले आहे. टिम बर्टन आणि मोनिका यांची पहिली भेट 2006 साली कान फिल्म फेस्टिव्हलदरम्यान झाली होती. त्यावेळी दोघेही स्वत:च्या जोडीदारासोबत कमिटेड होते. यानंतर 2022 मध्ये पुन्हा ते भेटले आणि त्यांची प्रेमकथा पुढे सरकली. स्पेनच्या गल्ल्यांपासून रोम फिल्म फेस्टिव्हलपर्यंत दोघांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

Advertisement

बर्टनने मोनिकाला 2024 मध्ये प्रदर्शित चित्रपट ‘बीटलीज्युस’मध्ये ‘डेलोरेस’ ही भूमिका दिली होती. हा चित्रपट 1988 चा कल्ट क्लासिक चित्रपटचा सीक्वेल आहे. टिम बर्टन यांची एकूण संपत्ती 100 दशलक्ष डॉलर्स इतकी प्रचंड आहे. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये त्यांच्या अनेक आलिशान संपत्ती आहेत.

बर्टन हे 2001-14 पर्यंत अभिनेत्री हेलेना बोनहम कार्टरसोबत रिलेशनशिपमध्ये राहिले होते. दोघांनी विवाह केला नाही, परंतु त्यांना दोन अपत्यं आहेत. हेलेनापासून वेगळे झाल्यावर टिमने त्यांना पोटगी म्हणून 166 कोटी रुपये दिले होते. तर मोनिका ही पूर्वी प्रेंच अभिनेता विन्सेंट कॅसलची पत्नी होती. त्यांनी 1999 मध्ये विवाह केला होता आणि 2013 मध्ये विभक्त झाले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.