For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

18 पर्यंत सिसोदिया तिहार कारागृहातच

07:00 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
18 पर्यंत सिसोदिया तिहार कारागृहातच
Advertisement

न्यायालयीन कोठडीत वाढ

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयाने शनिवारी आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी 18 एप्रिलपर्यंत वाढवली. यापूर्वीची मुदत संपल्यानंतर त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले. मनीष सिसोदिया यांनी एक दिवस आधी तुऊंगातून पटपरगंजच्या लोकांना पत्र लिहून लवकरच बाहेर येईन असे सांगितले होते. त्यांच्या या पत्रऊपी संदेशामुळे ते कारागृहातून बाहेर पडतील अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, न्यायालयीन कोठडीची मुदत वाढवल्यामुळे आता त्यांना तिहार तुऊंगातच रहावे लागणार आहे. यापूर्वी मनीष सिसोदिया यांचे सहकारी आणि मद्य धोरण प्रकरणातील सहआरोपी संजय सिंह यांना नुकताच सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. मद्य घोटाळ्यातील कथित भूमिकेसाठी सीबीआयने 26 फेब्रुवारी 2023 रोजी मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. त्यानंतर सीबीआयच्या एफआयआरमधून उद्भवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात 9 मार्च 2023 रोजी ईडीने सिसोदिया यांना अटक केली होती. सिसोदिया यांनी 28 फेब्रुवारी 2023 रोजी दिल्ली मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणाचा तपास गेल्या वर्षभरापासून सुरू असून शनिवारी सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, त्यांना दिलासा मिळाला नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.