म.ए.समिती महिला आघाडीतर्फे तिळगुळ समारंभ
बेळगाव : म. ए. समिती महिला आघाडीतर्फे लोकमान्य रंगमंदिर येथे तिळगुळ समारंभ आयोजित करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून अॅड. तृप्ती सडेकर उपस्थित होत्या. तसेच महिला आघाडीच्या सदस्या माजी उपमहापौर रेणू मुतकेकर, आघाडीच्या सचिव सरिता पाटील, मधुश्री पुजारी, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, रूपा नेसरकर, माया कडोलकर उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर होत्या. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर अर्चना देसाई व सहकाऱ्यांनी स्वागत गीत व ईशस्तवन सादर केले. रेणू किल्लेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अॅड. सडेकर यांनी महिला कायद्यांची माहिती दिली. हजारो संकटे येऊनही स्त्राr कणखरपणे उभी राहते व तिने उत्तुंग यश मिळविले तरी ती आपले बाईपण विसरत नाही. आपली संस्कृती, चालीरिती, परंपरा जतन करते, असे सांगितले. यानंतर विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
त्यांचा निकाल पुढीलप्रमाणे : नृत्य स्पर्धा : प्रथम स्फूर्ती सांस्कृतिक ग्रुप, द्वितीय सांस्कृतिक ग्रुप, तृतीय गणेश ग्रुप, उत्तेजनार्थ : उमा भाटी ग्रुप, मंगाई भजनी मंडळ, मंगळगौर स्पर्धा : सुकन्या ग्रुप.