For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ठळकवाडी संघाकडे हनुमान चषक

10:24 AM Nov 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
ठळकवाडी संघाकडे हनुमान चषक
Advertisement

अजय लमाणी मालिकावीर, विराज बी. सामनावीर

Advertisement

बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित हनुमान चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ठळकवाडी संघाने भातकांडे संघाचा 6 गड्यांनी पराभव करून हनुमान चषक पटकाविला. अजय लमाणी मालिकावीर तर वीराज बी. सामनावीर ठरला. प्लॅटिनम ज्युबली मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात गजाननराव भातकांडे संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी बाद 103 धावा केल्या. महम्मद हमजाने 2 चौकारासह 38, शाहरूख धारवाडकरने 14 तर मीर एम. व औदुंबर यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. ठळकवाडीतर्फे रोहित जाधवने 17 धावात 2, नमन दड्डीकरने 21 धावात 2 तर वीराज बी. ने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना ठळकवाडी संघाने 17.5 षटकात 4 गडी बाद 104 धावा करून सामना 6 गड्यांनी जिंकला. वीराज बी. ने 3 चौकारांसह 36, श्री हुंदरे 3 चौकारासह 24 तर प्रज्योत उघाडेने 20 धावा केल्या. भातकांडेतर्फे सलमान व मिहीर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे अविनाश पोतदार, पुरस्कर्ते आनंद सोमण्णाचे, प्लॅटिनम ज्युबलीचे चेअरमन आनंद सराफ, विवेक पाटील, बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर वीराज बी. ठळकवाडी, उत्कृष्ट फलंदाज सचिन तलवार भातकांडे, उत्कृष्ट गोलंदाज वीराज बी. ठळकवाडी व मालिकावीर अजय लमानी लव्हडेल यांना चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यासाठी दत्तप्रसाद जांबवलेकर, जोतिबा पवार, साहिल वेर्णेकर यांनी पंचगिरी केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.