For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ठळकवाडी, हेरवाडकर, केएलई, लिटल कॉलर्स विजयी

10:35 AM Nov 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
ठळकवाडी  हेरवाडकर  केएलई  लिटल कॉलर्स विजयी
Advertisement

बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित हनुमान चषक 16 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातुन एम. व्ही. हेरवाडकर केएलईचा,ठळकवाडीने ब्लुमिंग बर्डचा लिटल स्कॉलर्सने बिर्लाचा, ज्ञान प्रबोधनने भातकांडे संघांनी मात करुन विजय मिळविले. आयुष सरदेसाई, विराज माळवी, श्रेयश बस्तवाडकर, प्रितम बडकण्णवर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. प्लॅटिन ज्युब्ली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात ठळकवाडी संघाने प्रथम फलदांजी करताना 15 षटकातट 4 गडीबाद 127 धावा केल्या. त्यात श्रेयश बस्तवाडकरने 59, कृष्णा सुतारने 31, मंथन घाटगेने 14 धावा केल्या. ब्लुमिंग बर्डतर्फे समर्थ कांबळेने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना ब्लुमिंग बर्डचा डाव 11.4 षटकात सर्व गडीबाद 76 धावांत आटोपला. त्यात नितीन पावसकर व समर्थ यड्डूरशेट्टी यांनी प्रत्येकी 15 तर यशोनंदने 11 धावा केल्या. ठळकवाडीतर्फे नागेश्वर बेनकेने 3, वेदांत पोटे व प्रज्योत उघाडे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

Advertisement

दुसऱ्या सामन्यात लिटल्स स्कॉलरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी बाद 144 धावा केल्या. त्यात प्रितम बडकन्नावरने 3 चौकारासह 33, अथर्वने 24 तर प्रितमने 14 धावा केल्या. बिरलातर्फे मिहीत पटेल, निकीत चव्हाण यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बिरला संघाने 20 षटकात 9 गडी बाद 110 धावा केल्या. त्यात नरेंद्र सनदीने 22, अथर्व बाळेकुंद्रीने 18 तर प्रज्वल पोतदारने 11 धावा केल्या. लिटस् कॉलतर्फे दिगंद कोळेकरने 3 तर प्रितमने 2 गडी बाद केले. तिसऱ्या सामन्यात भातकांडे संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी बाद 107 धावा केल्या. त्यात मोहम्मद हमजाने 29, शाहरुख धारवाडकरने 18, स्वयंम मोरेने 17 तर औदुंबरने 11 धावा केल्या. ज्ञान प्रबोधनतर्फे सुजल गोरलने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना ज्ञान प्रबोधनने 12.5 षटकात 4 गडी बाद 109 धावा करुन सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात आयुर सरदेसाईने 57, आयुष आजगावकरने 25 तर आयुष अणवेकरने 11 धावा केल्या. भातकांडेतर्फे शाहरुख धारवाडकर, निहीर मिरजी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

चौथ्या सामन्यात केएलईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी बाद 134 धावा केल्या. त्यात करण रामगुरवाडीने 48, आर्यन मालुने 18, योगेशने 16 तर आयुष आणि विख्यात यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. हेरवाडकरतर्फे विराज माळवीने 3 तर सिद्धांत मेणसेने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तदाखल खेळताना हेरवाडकरने 19.4 षटकात 6 गाडी बाद 138 धावा करुन सामना 4 गड्यांनी जिंकला. त्यात लक्ष्य खतायतने 50, हर्ष नाशिपुडीने 35, विराज माळवीने 23 धावा केल्या. केएलईतर्फे अतिथ भोगणने 4 गडी बाद केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.