टिळकवाडी विभागीय क्रीडा स्पर्धा 31 जुलै पासून प्रारंभ
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे व गोमटेश विद्यापीठ मजगाव स्कूल आयोजित टिळकवाडी विभागीय क्रिडा स्पर्धा 31 जुलैपासून प्रारंभ होणार आहे. येथील गोमटेश स्कूलच्या सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत बेळगाव शहराचे पीईओ. जे. बी. पटेल, मुख्याध्यापक महांतेश हिरेमठ, सी. आर. मास्तीहोळी, टिळकवाडी विभागीय शारीरीक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष स्विल्वीया डिलीमा, सचिव प्रविण पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या बैठकीत 2025-26 च्या विभागीय क्रिडास्पर्धांच्या भरविण्याबद्दल जे. बी. पटेल यांनी सांगितले. त्यानुसार क्रिडा स्पर्धांचे वेळापत्रक ठरविण्यात आले.
31 जुलै रोजी कराटे स्पर्धा केएलएस स्कूल येथे होणार, 1 ऑगस्ट रोजी योगा व बुद्धीबळ गोमटेश स्कूल येथे होणार, 2 ऑगस्ट रोजी टेबल टेनिस केएलएस स्कूल, 4 ऑगस्ट रोजी बॅटमिंटन व कब्बडी, 5 रोजी मुलींची कब्बडी व क्रिकेट, 6 रोजी थ्रोबॉल व व्हॉलीबॉल मुलामुलींची गोमटेश येथे होणार, 10 रोजी बास्केटबॉल डीपी स्कूल, 11 रोजी फुटबॉल लेले मैदान, 13 रोजी हॉकी लेले मैदानवर, 16 रोजी बॉल बॅटमिंटन डेपो मैदानावर, 18 रोजी हँडबॉल के.एल.एस येथे. अॅथलेटिक्स स्पर्धा 22 व 23 रोजी जिल्हा क्रीडांगणावर आयोजित करण्यात आले आहे. या बैठकीला सी. आर. पाटील, जे. बे. पटेल, जयसिंग धनाजी, उमेश मजूकर, कृष्णा भेकणेसह इतर मान्यवर उपस्थित होते.