For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

भारत अ संघाच्या कर्णधारपदी तिलक वर्मा

06:23 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारत अ संघाच्या कर्णधारपदी तिलक वर्मा
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

डोहा येथे खेळविल्या जाणाऱ्या 2026 च्या रायजिंग स्टार्स आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारत अ संघाच्या कर्णधारपदी तिलक वर्माची नियुक्ती करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी 15 सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आला असून वैभव सूर्यवंशीचा समावेश करण्यात आला आहे. तर दुखापतीच्या कालावधीनंतर हर्षित राणाचे संघात पुनरागमन झाले आहे. या संघामध्ये अभिषेक शर्मा,रिंकू सिंग, प्रिन्स यादव यांनाही स्थान देण्यात आले आहे. या स्पर्धेत भारत अ ब गटात असून या गटामध्ये संयुक्त अरब अमिरात (युएई), नेपाळ, पाक अ संघ यांचा समावेश आहे. भारत अ संघाचा या स्पर्धेतील पहिला सामना 20 नोव्हेंबरला नेपाळबरोबर होईल. त्यानतंर भारत अ संघाचा दुसरा सामना पाक अ संघाबरोबर 22 नोव्हेंबरला तर तिसरा सामना 24 नोव्हेंबर संयुक्त अरब अमिरातबरोबर होईल. अ विभागामध्ये बांगलादेश अ, अफगाण अ आणि श्रीलंका अ यांचा सहभाग आहे. या दोन गटातील आघाडीचे पहिले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. गेल्या खेपेला झालेल्या या स्पर्धेत भारत अ संघाचे आव्हान उपांत्य फेरीत बांगलादेश अ संघाकडून सुपर ओव्हरमध्ये संपुष्टात आले होते.

Advertisement

भारत अ संघ: तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग, रजत पाटीदार, रिंकू सिंग, कुमार कुशाग्रह, सूर्यंश शेडगे, शहबाज अहमद, विपराज निगम, हर्ष दुबे, तनुष कोटियान, हर्षित राणा, प्रिन्स यादव आणि अर्शद खान.

Advertisement
Tags :

.