For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

तैवानकडून टिकटॉक धोकादायक घोषित

06:43 AM Mar 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
तैवानकडून टिकटॉक धोकादायक घोषित

अमेरिकेकडून चीनला यापूर्वीच झटका

Advertisement

वृत्तसंस्था/ तैपेई

चीनचा शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप टिकटॉकच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. अलिकडेच अमेरिकेने या अॅपला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून धोकादायक ठरवत एक विधेयक संमत केले होते. हे प्रकरण अद्याप शमलेले नसतानाच आणखी एका देशाने या सोशल मीडिया अॅपला देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक घोषित केले आहे.

Advertisement

हा देश म्हणजे तैवान असून त्यावर चीन स्वत:चा दावा दर्शवित असतो. तैवानचे डिजिटल मंत्री ऑड्रे टैंग यांनी चीनची मालकी असलेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक घोषित केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकचा विदेशी विरोधकांसोबत संबंध राहिला असल्याचे टॅग यांनी म्हटले आहे. त्यांचा इशारा चीनच्या दिशेने होते. अमेरिकेने अशाचप्रकारचा दृष्टीकोन मांडत टिकटॉकवर बंदी घालण्याची तयारी चालविली आहे. सद्यकाणत हा अॅप अनेक देशांसाठी धोकादायक ठरला आहे.

Advertisement

तैवानच्या डिजिटल मंत्र्याने यापूर्वी टिकटॉक अॅपला देशासाठी धोकादायक उत्पादन म्हणून घोषित केले होते. या अॅपला चीनच्या सरकारकडून नियंत्रित करण्यात येत आहे. याचे अनेक नकारात्मक परिणाम समोर आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तैवानने उचललेले हे पाऊल अमेरिकेने घेतलेल्या निर्णयाचे अनुकरण करणारा आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाने अलिकडेच टिकटॉकची मूळ कंपनी बाइटडान्सला लक्ष्य करत एक विधेयक संमत केले होते. सोशल मीडिया अॅपला एखाद्या अमेरिकन कंपनीला विकण्यात यावे, अन्यथा राष्ट्रव्यापी बंदीला सामोरे जाण्यासाठी तयार रहावे असे या विधेयकात नमूद आहे.

भारताने यापूर्वीच टिकटॉक या चिनी अॅपवर बंदी घातली आहे. या अॅपचा डाटा चीनच्या सरकारच्या हाती जात असल्याने ही बंदी घालण्यात आली होती. याचबरोबर अनेक देशांमध्ये टिकटॉकबद्दल चिंता व्यक्त होत असून लवकरच तेथेही बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. तर चीनने स्वत:च्या अॅपवर बंदी घालण्याच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.

Advertisement
Tags :
×

.