Ichalkaranji : इचलकरंजीत महानगरपालिका निवडणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
इचलकरंजीत निवडणूक सुरक्षेसाठी पोलिसांचा व्यापक सराव
इचलकरंजी : इचलकरंजी येथील महानगरपालिका निवडणूक शांततेत, निर्भय आणि कायद्याच्या चौकटीत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारीची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून शनिवारी सकाळी शहरात पथसंचलन तर सायंकाळी बोरात चौक येथे दंगल काबू प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले.
सकाळचे पथसंचलन बंडगर मळा, तीन बत्ती चौक, डी-मार्ट, छत्रपती संभाजी चौक ते संग्राम चौक या मार्गावरून काढण्यात आले. या संचलनात ५ पोलीस अधिकारी, २० पोलीस अंमलदार आणि १८ होमगार्ड सहभागी झाले होते. शहरातील संवेदनशील भागांतून काढलेल्या या पथसंचलनामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून समाजकंटकांना कडक इशाराठी देण्यात आला.
दरम्यान सायंकाळी खवरे मार्केट, बोरात चौक येथे दंगल काबू योजनेचा सराव घेण्यात आला. दंगलसदृश परिस्थितीत पोलिसांनी कशी तत्काळ कारवाई करावी, जमाव कसा पांगवावा, परिस्थिती नियंत्रणात कशी आणावी याबाबत चेट प्रात्यक्षिके 5 सादर करण्यात आली. या सरावामुळे निवडणूक काळात उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही अनुचित घटनेला तत्काळ व आणि प्रभावी प्रतिसाद देण्याची पोलिसांची तयारी दिसून आली.
या उपक्रमावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, सचिन सूर्यवंशी, महेश चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी नागरिकांनीही पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.