महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

व्याघ्र क्षेत्र : सुनावणी डिसेंबरच्या दुसऱ्या सप्ताहात

11:41 AM Nov 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : म्हादई अभयारण्य व आजूबाजूचा परिसर ‘व्याघ्र क्षेत्र’ म्हणून अधिसूचित करण्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली गोव्याची याचिका डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणीस येण्याची शक्यता असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. म्हादई अभयारण्य व आजूबाजूचा परिसर ‘व्याघ्र क्षेत्र’ म्हणून अधिसूचित करावा, यासाठी गोवा फाऊंडेशनने खंडपीठात याचिका दाखल केली होती. या संदर्भात 24 जुलै रोजी खंडपीठाने राज्य सरकारला पुढील तीन महिन्यांत म्हादई अभयारण्य क्षेत्र आणि आजूबाजूचा परिसर व्याघ्र क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याचा आदेश दिला होता. तो पाळला नसल्याने अवमान होण्याची शक्यता होती. मात्र सदर याचिका सर्वोच्च न्यायालयात येणे अधिक सोयीचे असल्याने याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठातील सुनावणी 11 डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

Advertisement

फाऊंडेशन, केंद्राकडून प्रतिज्ञापत्र सादर होणार

Advertisement

‘व्याघ्र क्षेत्र’  प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात  याचिकादार गोवा फाऊंडेशनने प्रतिज्ञापत्र सादर करणे बाकी आहे. ते  प्रतिज्ञापत्र 20 नोव्हेंबरला देण्याचे आधी ठरले होते, अन्य काही कामामुळे ते  सादर करण्यास उशीर झाला.  आता हे प्रतिज्ञापत्र या आठवड्यातच सर्वोच्च न्यायालयात सादर केले जाणार आहे. त्यानंतर, केंद्र सरकारकडूनही प्रतिज्ञापत्र दाखले केले जाणार आहे. दोन्ही बाजूनी सर्वोच्च न्यायालयात आपले म्हणणे मांडल्यानंतरच याचिकेच्या सुनावणीची तारीख निश्चित केली जाणार असल्याची माहिती गोवा फाऊंडेशनचे क्लाउड आल्वारीस यांनी दिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article