For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

अभिनेता टायगर श्रॉफवर हल्ला केल्यानंतर शुटर्सनी नेमकं काय केलं?..जाणून घ्या सविस्तर

10:33 AM Oct 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
अभिनेता टायगर श्रॉफवर हल्ला केल्यानंतर शुटर्सनी नेमकं काय केलं   जाणून घ्या सविस्तर
Advertisement

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहू परिसरातील पुष्पा पार्क येथे झालेल्या कथित गोळीबाराच्या घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास आता मुंबई क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला असून, फरार हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला. हल्लेखोरांनी रिव्हॉल्व्हरमधून सातच्या आसपास गोळ्या झाडल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेत वाहनचालक आणि गर्दीतील एक व्यक्ती जखमी झाल्याचे वृत्त आहे.

बाईकचा वापर करून पलायन

Advertisement

गोळीबारानंतर संशयित तिघे दुचाकीवरून अंधेरीच्या दिशेने पसार झाल्याचे तपासात समोर आल्याचे वृत्त आहे. त्यानंतर त्यांनी अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात दुचाकी सोडून लोकल ट्रेनने पुढील प्रवास केल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, ते नेमके कुठे गेले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

पोलिसांनी अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकाजवळून पल्सर दुचाकी जप्त केली आहे. या वाहनाच्या मालकीसंबंधी माहिती गोळा केली जात असून, दुचाकीच्या पूर्वीच्या मालकांचीही चौकशी सुरू आहे. वाहनाची कागदपत्रे संबंधित खरेदीदाराच्या नावावर हस्तांतरित झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

फॉरेन्सिक तपास आणि सीसीटीव्हीवर भर

गोळीबार झालेल्या वाहनाची न्यायवैद्यक पथकाने तपासणी केली आहे. घटनास्थळासह संशयितांच्या संभाव्य मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यांच्या हालचालींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बिश्नोई टोळीशी संबंधांचा तपास

या हल्ल्याची जबाबदारी अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांचा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचेही वृत्त आहे. मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी आणि हल्ल्यामागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे.

दरम्यान, संशयित पुण्यात पोहोचले असण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे पोलिसांनीही सतर्कता वाढवल्याचे वृत्त आहे. मुंबई क्राईम ब्रँच आता या प्रकरणातील सर्व धागेदोरे तपासत असून, संशयितांचा शोध आणि हल्ल्यामागील सूत्रधारांचा उलगडा करणे हे पोलिसांसमोरील प्रमुख आव्हान आहे.

Advertisement
Tags :

.