महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हब्बनहट्टी-कालमणी परिसरात वाघाचा वावर

10:51 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हत्ती, गवे, डुक्करांचा उपद्रव : शेतकऱ्यांच्या पिकांची हानी

Advertisement

वार्ताहर/कणकुंबी

Advertisement

जांबोटी भागातील कालमणी, हब्बनहट्टी परिसरात गेले पंधरा दिवस टस्कर हत्तीने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या ऊस, रताळी व भात पिकांचा फडशा पाडण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. गेले पंधरा दिवस हत्तीला वैतागलेल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असताना आता उचवडे परिसरात दिसलेला वाघ हब्बनहट्टी, कालमणी परिसरात वावरत असल्याने पुन्हा भीतीच्या वातावरणात भर पडली आहे. एकीकडे वाघाची दहशत तर दुसरीकडे हत्ती, गवे व डुक्कर अशा विविध प्राण्यांच्या उपद्रवाला शेतकरी कंटाळून गेले आहेत. हत्तीने कालमणी येथील शेतकरी रमेश सुतार यांच्या ऊस पिकाचा पूर्णपणे फडशा पाडून आपला मोर्चा आता हब्बनहट्टीकडे वळविला आहे. येथील शेतकऱ्यांच्या भात, रताळी आणि शेंगा पिकांची डुक्कर व गव्यांनी मोठ्या प्रमाणात नासधूस चालवल्याने या भागातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. याबाबतीत वनखाते मात्र निद्रिस्त असून दिवसेंदिवस या भागामध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढलेला आहे. येथील महादेव गावडे, नामदेव पाटील, मारुती नाईक, लक्ष्मण क. पाटील, गावडू मा. गावडे, पांडुरंग मारुती गावडे, शंकर आ. घाडी व इतर शेतकऱ्यांच्या रताळी, शेंगा, भात व ऊस पिकांचे जंगली प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांनी शेतीकडे फिरवली पाठ 

जांबोटी-कणकुंबी भागातील जवळपास 50 टक्के शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांच्या उपद्रवाला कंटाळून शेतीला रामराम करून रोजगारासाठी गोवा गाठले आहे. वनखात्याकडून मिळणारी नुकसानभरपाई तटपुंजी असून उत्पादन घेण्यासाठी येणारा खर्च अधिक अशी केविलवाणी अवस्था शेतकरी वर्गाची आहे. फोटो, पंचनामा, महसूल खात्याची कागदपत्रे, उतारा इत्यादी गोष्टी जमा करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आर्थिक वजन ठेवावे लागते. तलाठी सर्टिफिकेट मिळण्यासाठी आटापिटा करावा लागतो. शेतकऱ्यांना वनखात्याचे आणि महसूल खात्याचे उंबरठे झिजवण्यापेक्षा ती नुकसान भरपाईच नको रे बाबा आणि शेतीही नको म्हणून शेतीलाच राम राम करून शेतकरी वर्ग रोजगारासाठी गोवा किंवा इतर मोठ्या शहरांकडे धाव घेत आहे. प्रशासन मात्र याबाबतीत निद्रिस्त असून या भागात शेतकऱ्यांना कुठल्याही रोजगाराची संधी उपलब्ध नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article