Sangli News : चांदोली परिसरात वाघीणीचा उद्रेक; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वन्य प्राणी उद्रेकामुळे सोशल मीडियावर चर्चा
वारणावती : सध्या ताडोबातील वाघीणीनेचांदोली परिसरातील बफर झोन ठाण मांडले असतानाच शनिवारी टी १ वाघाचे छायाचित्र वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यातील छायाचित्र मोबाईल वरून प्रसारित झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण तर काही अधिकारी निर्मित फोटो असल्याचे सांगतात तर काहीचा मोबाईल स्विच ऑफ आहे.
मात्र चांदोली परिसरात जनजागृती करणे गरजेचे आहे वन्य प्राण्यापासुन नागरिकांचे संरक्षण हवे असल्यास स्थानिक नागरिक व वन विभागचे समन्वय असणे गरजेचे आहे आज ज्या परिसरात वाघ असल्याचे सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. त्या परिसरात वन विभागाच्या वेगवेगळ्या पाच रेंज असल्याने यामध्ये शाहूवाडी प्रादेशिक, शिराळा प्रादेशिक चांदोली वन्यजीव ढेबेवाडी वन्यजीव अंबा वन्यजीव अशा पाच रेंज आहेत यात अधिकाऱ्यांच्या ताळमेळ नसल्याचे दिसुन येते आहेत.
चांदोली परिसरातील मणदूर सोनवडे गुढे पाचगणी ता. शिराळा तर शित्तुर उखळू उदगीरी ही ता. शाहूवाडी मोडतात त्याचबरोबर कचनी धनगरवाडा हा पाटण तालुक्यात मोडत आहेही गावे सहयाद्री व्याघ्र प्रकल्पानजीक बफर झोन व प्रादेशिक वन विभागात मोडतात. प्राण्याच्या उद्रेक झाल्यास तात्काळ मदतीसाठी यांना जवळचे कार्यालय चांदोली येथील आहे, पण हद्दीच्या प्रश्रांनामुळे तात्काळ मदत भेटणे अशक्य होत आहे.
यामुळे नागरिकांच्या बरोबर वन्यजीव ही धोक्यात आहे हे सांगायला कोणत्या जोतिषाची गरज नाही. वन्य प्राण्याची सुरक्षिता पहता येणाऱ्या उन्हाळ्यात वणवे लागल्यास जीवसृष्ठी ताकाळ मदत ही चांदोली स्थित वारणावती कार्यालयातून झटपट यंत्रणा राबवून मिळू शकते पण भौगोलिक परिस्थितीचा विचार करून यंत्रणा राबवल्यास हानी टळू शकते. भौगोलिक परिस्थितीची जाणीव न ठेवता वन्य अधिकाऱ्यांनी ज्या सिमा निर्धारित केल्या आहेत त्या वन्य प्राण्यांच्या हितासाठी की अधिकारांच्या सोयीसाठी याचा परिणाम चांदोली परिसरातील नागरिकावर होत आहे.