डिगस येथे भरवस्तीत वाघ अथवा बिबट्याचा वावर
हल्ल्यात एक श्वान ठार ; ग्रामस्थ भितीच्या छायेखाली
डिगस-
डिगस येथे गेले काही दिवस वाघ अथवा बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरु असताना दि 21 जानेवारी रोजी देवदर्शनाहुन घरी परतणाऱ्या ग्रामस्थांना डिगस करिवणे टेंबवाडी येथे सदर जनावर निदर्शनास आले .सदर जनावर हे येथील रहिवाशी नंदु तावडे याच्या कंपाऊंड वरुन उडी घेत कसबले याच्या घराच्या दिशेने जोरात निघुन गेले दरम्यान , त्याच वेळात आलेल्या जनावराने केलेल्या हल्ल्यात एक श्वानही ठार झाला आहे .या प्रकाराने डिगस ग्रामस्थ भितीच्या छायेखाली वावरत आहेत. आज सकाळी हा प्रकार स्थानिकांच्या कानावर घातल्यावर येथील निखील कांदळगावकर, प्रविण पवार,अरुण सावंत, राजा पवार यांनी वन अधिकाऱ्यांना फोन करुन तात्काळ घटनेची कल्पना दिली . वन विभागाने सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत रात्री गस्थ वाढवून सदर जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे .