महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बाकनूर शिवारात वाघसदृश प्राण्याचा बकऱ्यांवर हल्ला

11:20 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बकऱ्याचे पिल्लू केले फस्त : दोन बकऱ्यांसह-कुत्र्यावर हल्ला : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, बंदोबस्त करण्याची मागणी 

Advertisement

वार्ताहर/किणये 

Advertisement

बाकनूर शिवारात वाघसदृश प्राण्याने बकऱ्यांवर हल्ला केला आहे. एक बकऱ्याचे पिल्लू फस्त केले असून दोन बकरी व एका कुत्र्यावरही सदर वाघसदृश प्राण्याने हल्ला केला आहे. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडला. थेट शिवार परिसरात वाघसदृश प्राणी आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाकनूर गावातील अर्जुन धाकलू नाईक हे आपली 10-12 बकरी चारण्यासाठी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवारात गेले होते. सदर शिवार हे डोंगर पायथ्याशी आहे. त्यांनी आपल्या शेतात बकरी चारण्यासाठी सोडली होती. त्यांच्या शेताच्या बाजूलाच अन्य शेतकऱ्यांची ऊस पिकाची शेती आहे. तर आजूबाजूला झाडे-झुडपे आहेत. सदर प्राणी डोंगर परिसरातून शिवारात येऊन त्याने थेट बकऱ्यांवरच हल्ला केला. बकऱ्यांचा व कुत्रे भुंकण्याचा आवाज ऐकून शेतकरी हल्ल्याच्या ठिकाणाजवळ आला. सुमारे 15 ते 16 फुटावरून त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला.  सदर वाघसदृश प्राण्याने बकऱ्यांवर हल्ला केला. यावेळी बाजूलाच असलेल्या कुत्र्याने त्यांची सोडवणूक करून घेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र त्या प्राण्याने कुत्र्यावरही हल्ला केला व एक बकऱ्याचे पिल्लू जंगल परिसरात ओढून नेले.

हा प्रकार पाहून अर्जुन नाईक हे भयभीत झाले. त्यांनी जखमी बकऱ्यांना घेऊन कसेबसे गाव गाठले.  या हल्ल्यात शेळ व पिल्लू गंभीर जखमी असून सुमारे 12 हजार ऊपये किमतीचे पिल्लू त्या प्राण्याने फस्त केल्याचे शेतकऱ्याने सांगितले. गेल्या 20 दिवसांपूर्वी कृष्णा गावडे हे शेतकरी डोंगर परिसरात जनावरे घेऊन गेले होते. यावेळी सदर वाघसदृश प्राण्याने गाय व कुत्र्यावर हल्ला केला होता. मात्र त्यावेळी जीवितहानी झाली नव्हती. पुन्हा असा प्रकार मंगळवारी झाल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. या प्रकाराची वनखात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असून बुधवारी सकाळी ते पाहणी करणार आहेत. या परिसरात वाघसदृश प्राण्याचा वावर वाढल्यामुळे आता शेत शिवारात जायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी या प्राण्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

कुत्र्याच्या प्रसंगावधानामुळे माझा जीव वाचला

रोजच्याप्रमाणे मी बकरी चारण्यासाठी शिवारात घेऊन गेलो होतो. सायंकाळी अचानक वाघसदृश प्राण्याने बकरी व कुत्र्यावर हल्ला केला. अवघ्या पंधरा फुटावरून सदर प्राण्याला मी पाहिले. सदर प्राणी हा मोठा होता. त्याच्या तोंडाला मिशा होत्या. तसेच त्याच्या अंगावर काळे व पांढरे पट्टे आहेत. कुत्र्याच्या प्रसंगावधानामुळे माझाही जीव वाचला अन्यथा माझ्यावरही हल्ला केला असता.

-अर्जुन नाईक, शेतकरी

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article