टायगर क्रिकेटर्सकडे कुडची प्रीमियर चषक
बेळगाव : बसवण कुडची येथे समाजसेवक परशराम बेडका व हिरेमठ ग्रुप आयोजित बसवण कुडची प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टायगर्स क्रिकेटर्सने जीटीएम स्पोर्ट्स संघाचा 5 गड्यांनी पराभव करून कुडची प्रिमियर चषक पटकाविला. अंतिम सामना जीटीएम (गजानन तऊण मंडळ) स्पोर्ट्स यांच्यात झाला. प्रथम गोलंदाजी करताना जीटीएम स्पोर्ट्सने 5 षटकात 52 धावा केल्या. जीटीएम स्पोर्ट्सचा कर्णधार लकी मुचंडीकर ने एकाकी लढत देताना धावांचा डोंगर रचला होता. टायगर क्रिकेटर्सचे किरण शंकरगौडाने 5 चेंडूत 5 चौकार मारत सामना आपल्या पारड्यात खेचून आणीत विजयाच शिल्पकार बनला.
अंतिम सामन्यात सामना अतितटीचा झाल्याने क्रिकेट प्रेमिनी चांगलाच आनंद घेतला. एसव्हीजे संघाने तिसरा क्रमांक मिळवून समाधान व्यक्त केले. बक्षिस वितरण अनिल बेनके, परशराम बेडका, राजशेखर हिरेमठ, शंकर रवळूचे, परशराम बेडका, बसवंत कौलगी, यल्लाप्पा मुचंडीकर, संभाजी गिरी, जोतिबा मुतगेकर, डॉ अमित हम्मनावर, अभय कित्तूर, बाबू बेडका, बाळू बेडका, यल्लाप्पा हलगेकर, कृष्णा दिवटे, विश्वनाथ बडिगेर, संजू बडिगेर, भरमू वंडरोटी, सुनील गिरी यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाना चषक देउन गौरविण्यात आले. किरण शंकरगौडाला सामनावीर पुरस्कार, तर लकी मुचंडीकरला उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरविण्यात आले.