टायगर अन् विद्युत एकत्र झळकणार
बागी फ्रेंचाइजी चित्रपटांद्वारे टायगर श्रॉफने प्रेक्षकांदरम्यान स्वत:साठी खास स्थान निर्माण केले आहे. तर कमांडो फेम अभिनेता विद्युत जामवाल देखील स्वत:च्या जबरदस्त अॅक्शनसाठी ओळखला जातो. आता दोन्ही कलाकार एकत्रित दिसून येणार आहेत. टायगर आणि विद्युतने एक पोस्ट शेअर केली असून यात एआय इमेजद्वारे निर्मित पोस्टर असून यात दोन्ही कलाकार दिसून येत आहेत. या पोस्टरवर ‘दो लिजेंड, एक एपिक शोडाउन“ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसेच टायगर श्रॉफ व्हर्सेस विद्युत असे लिहिले गेले आहे. या प्रोजेक्ट किंवा चित्रपटाला टी-सीरिजकडून निर्माण केले जाणार आहेत. याचाही उल्लेख पोस्टरवर करण्यात आला आहे. टायगर आणि विद्युतला अलिकडेच टी-सीरिजच्या कार्यालयाबाहेर पाहिले गेले आहे. टायगर हा मागील वर्षी ‘बागी 4’ या चित्रपटात दिसून आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. तर विद्युत एक हॉलिवूडपट ‘स्ट्रीट फायटर’मध्ये लवकरच दिसून येणार आहे.