For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रिजभूषण यांच्याऐवजी पुत्राला भाजपची उमेदवारी

07:00 AM May 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
ब्रिजभूषण यांच्याऐवजी पुत्राला भाजपची उमेदवारी
Advertisement

कैसरगंजमधून करण भूषण सिंह तर रायबरेलीमध्ये दिनेश प्रताप सिंह यांना तिकीट

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

भाजपने उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि कैसरगंज लोकसभा जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. कैसरगंजचे विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना उमेदवारी नाकारत ह्यावेळी त्यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना तिकीट देण्यात आले आहे. त्याचबरोबर रायबरेलीमधून दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी जाहीर केली आहे. कैसरगंजमध्ये 3 मे ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. करण सिंह शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दरम्यान, ब्रिजभूषण यांच्यावर आरोप करणाऱ्या कुस्तीपटू साक्षी मलिक हिने पुन्हा एकदा त्यांना टार्गेट करताना ‘पुत्र केवळ डमी उमेदवार असून सत्ता ब्रिजभूषण यांच्याकडेच राहील’ असे म्हटले आहे. भाजपने गुऊवारी संध्याकाळी दोन उमेदवारांची घोषणा केली. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या ब्रिजभूषण शरण सिंह यांचे भाजपने तिकीट रद्द केले आहे. मात्र, त्यांचा धाकटा मुलगा करण भूषण यांना भाजपने त्यांच्या कैसरगंज मतदारसंघातून संधी दिली आहे. करण भूषण हे उत्तर प्रदेश रेसलिंग असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. ते भारतीय कुस्ती संघटनेचे उपाध्यक्ष राहिले असून वडिलांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी हे पदही सोडले.

Advertisement

Advertisement
Tags :

.