For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात मल्टिप्लेक्स, चित्रपटगृहांमध्ये 200 रु. तिकीट दर

10:39 AM Sep 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
राज्यात मल्टिप्लेक्स  चित्रपटगृहांमध्ये 200 रु  तिकीट दर
Advertisement

बेंगळूर : राज्यातील मल्टिप्लेक्ससह चित्रपटांमध्ये एकसमान तिकीट दर निश्चित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार राज्यात मल्टिप्लेक्ससाठी 200 रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आले असून शुक्रवारपासून हा दर लागू करण्यात आला आहे. राज्य सरकारने यासंबंधी अधिकृत आदेश जारी केला आहे. राज्यातील सर्व मल्टिप्लेक्स, चित्रपटगृहांमध्ये एकसमान तिकीट दर लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. सर्व भाषेतील चित्रपटांसाठी कमाल 200 रु. तिकीट दर आकारावा, असे आदेशपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सिनेरसिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.