For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रज्ज्वल यांच्या प्रकरणाची माहिती असूनही मोदींकडून तिकीट

10:21 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रज्ज्वल यांच्या प्रकरणाची माहिती असूनही मोदींकडून तिकीट
Advertisement

एआयसीसीच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांचा आरोप

Advertisement

बेळगाव : भाजप-निजद युतीचे हासनचे उमेदवार खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांनी हजारो महिलांवर अत्याचार केल्याच्या प्रकरणाची माहिती असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना तिकीट दिले आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असा आरोप एआयसीसीच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांनी करून भाजपवर निशाणा साधला.एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांनी महिलांवर अत्याचार केल्याच्या घटनेची माहिती मोदी यांना होती तरी देखील त्यांना उमेदवारीचे तिकीट देण्यात आले आहे. त्यांच्यासाठी मोदी यांनी प्रचार करून मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ही अत्यंत खेदजनक बाब आहे, असे एआयसीसीच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांनी म्हटले आहे.

महिला सबलीकरणाबाबत बोलणारे आता कोणती भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे. महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटनेबाबत कोणत्याही केंद्रीय मंत्र्यांकडून अथवा भाजप नेत्यांकडून कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही ही खेदजनक बाब आहे. हासनचे निजद आमदार देवराज गौड यांनी प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याबाबत पंतप्रधानांना माहिती देऊन त्यांना तिकीट न देण्याची विनंती केली होती. तरीही याची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. प्रज्ज्वल यांचे वडील रेवण्णा  यांच्याकडून सदर व्हिडिओ चार वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ही घटना केव्हाही घडली तरी  चूक ती चूकच आहे, असा आरोप त्यांनी केला. यावेळी शिक्षणमंत्री डॉ. सुधाकर, आमदार राजू सेठ आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.