जागतिक संकेतामुळे गुरुवारचे सत्र तेजीत
एफएमसीजी व बँकिंगच्या कामगिरीत चमक : सेन्सेक्स 148अंकांनी वधारला
वृत्तसंस्था/मुंबई
भारतीय भांडवली बाजारात जागतिक पातळीवरील सकारात्मक घडामोडींचा फायदा झाला आहे. यामुळे चौथ्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक काहीसे तेजीत राहिले होते. यामध्ये बँकिंग व एफएमसीजी यांच्या समभागांमधील तेजीने बाजार वधारुन बंद झाला. दिवसअखेर सेन्सेक्स 148 अंकांनी वधारुन तो 81 हजाराच्या घरात पोहोचला होता. व्यापक स्थितीत मिड व स्मॉलकॅप यांच्या निर्देशांकांनी चांगली कामगिरी केली आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स गुरुवारी दिवसअखेर 147.89 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 0.18 टक्क्यांसह 81,053.19 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 41.30 अंकांनी वधारुन निर्देशांक 24,811.50 वर बंद झाला आहे.
मुख्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील 30 पैकी 17 समभाग हे तेजीत राहिले होते. यात भारती एअरटेल, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, टायटन आणि एशियन पेन्ट्स हे सेन्सेक्समध्ये पहिल्या पाच निर्देशांक सर्वाधिक मजबूत राहिले. यासह अल्ट्राटेक सिमेंट,जेएसडब्लू स्टील, मारुती सुझुकी, स्टेट बँक, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, कोटक बँक, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक,लार्सन अॅण्ड टुब्रो,बजाज फायनान्स आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग लाभात राहिले. अन्य कंपन्यांमध्ये 30 मधील 13 समभाग हें नुकसानीत राहिले. यात टाटा मोटर्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एनटीपीसी, टीसीएस व पॉवरग्रिड कॉप।s यांचे निर्देशांक प्रभावीत झाले. तर सनफार्मा अदानी पोटर्स, अॅक्सिस बँक, नेस्ले इंडिया, आयटीसी, इंडसइंड बँक, रिलायन्स आणि एचसीएल टेक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. गुरुवारच्या सत्रात जागतिक पातळीवरील सकारात्मक बाबींनी भारतीय बाजारला उचलून धरले. यात अमेरिकेचे बिगर कृषी रोजगाराचे आकडे सादर होण्याची शक्यता व अन्य काही देशांमधील शेअर बाजाराची कामगिरी यामुळे भारतीय बाजारातील कंपन्यांना बळ मिळाले.
जागतिक बाजारातून
आशियातील बाजारांमध्ये टोकीओ, सियोल आणि हाँगकाँग यांचे समभाग वधारले आहेत .तसेच शाघांय हा मात्र प्रभावीत होत बंद झाला. दुपारपर्यंत व्यवहारात युरोपीय बाजार तेजीत होता.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- भारती एअरटेल 1486
- टाटा स्टील 154
- आयसीआयसीआय 1190
- टायटन 3603
- एशियन पेन्ट्स 3184
- अल्ट्राटेक सिमेंट 11307
- जेएसडब्लू स्टील 933
- मारुती सुझुकी 12297
- एसबीआय 820
- बजाज फिनसर्व्ह 1626
- इन्फेसिस 1879
- कोटक महिंद्रा 1820
- टेक महिंद्रा 1610
- एचडीएफसी बँक 1631
- लार्सनअॅण्डटुब्रो 3606
- बजाज फायनान्स 6741
- हिंदुस्थान युनि 2791
- डाबर इंडिया 646
- वेदान्ता 459
- हिरोमोटो 5328
- कोलगेट 3602
- अंबुजा सिमेंट 632
- अशोक लेलँड 261
- आयआरसीटीसी 939
समभाग घसरलेल्या कंपन्या
- टाटा मोटर्स 1068
- महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 2733
- विप्रो 518
- एनटीपीसी 403
- टीसीएस 4499
- पॉवरग्रिडकॉर्प 333
- सनफार्मा 1750
- अॅक्सिस बँक 1169
- नेस्ले 2545
- आयटीसी 504
- इंडसइंड बँक 1383
- रिलायन्स 2995
- एचसीएल टेक 1676
- हॅवल्स इंडिया 1895
- ओएनजीसी 324
- झोमॅटो 257
- कमिन्स 3806